सर्वसामान्य माणूस दहा जन्म घेऊनही जेवढे काम करू शकत नाही एवढे - व्याप्ती ,उंची व खोली यांच्या दृष्टिकोनातून भव्य कार्य उभारणारे एक जेष्ट समाजसेवक कुष्ठरोग्यांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी चंद्रपुर जिल्ह्यातील वरोरा येथे आनंदवन आश्रमातील स्थापना करणारे मुरलीधर देवीदास आमटे उर्फ बाबा आमटे बाबांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे झाला.
त्यांचे महाविदयालयीन शिक्षण नागपुर येथे झाले.१९३४ साली बाबांनी बी ए ची पदवी संपादन केली त्यानंतर १९३६ साली त्यांनी एल एल बी ही पदवी संपादन केली १९४९-५० या काळात त्यांनी कुष्टरोगनिदानवरील त्यांच्या अभ्यासक्रम पूर्ण केला महात्मा गांधीच्या सेवाग्रम आश्रमात राहत असताना गांधी विचारांनी प्रभावित होऊन त्यात बाबांनी स्वःताला झोकून दिले १९४३ मध्ये वंदे मातरम ची घोषणा दिल्याबद्द्ल त्यांना २१ दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागला स्वतंत्र्यप्राप्तीनंतर कुष्टरोग निर्मूलनाच्या कार्या बरोबरच त्यांनी इतरही राष्ट्रीय महत्वाच्या प्रश्नांवर विविध मार्गाने आंदोलने केली तसेच राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी बाबांनी १९८५ मध्ये 'भारत जोड़ो ' अभियान योजले होते. नर्मदा बचाव या आंदोलनात तब्बल १२ वर्ष नर्मदाकाठी मुक्काम करून त्यांनी या आंदोलनाला पाठबळ दिले होते.
बाबांनी कुष्टरोगासारख्या महाभयंकर रोगने ग्रस्त झालेल्या लोकांची सेवा करण्याचे अतिकठिन व्रत बाबांनी स्वीकारले त्यांच्या प्रणेतून १९५१ साली आनंदवन ची स्थापना झाली। मरणापेक्षा भयान आणि कबरीपेक्षा भयंकर असे काही असेल तर ते म्हणजे कुष्टरोग्याचे आयुष्य पण बाबांनी या सर्वाना अपलेसे करून घेतले महारोगी सेवासमिती या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून बाबांनी कार्यचा विस्तार केला सर्वांकडे पाहण्याचा समान दृष्टिकोण बाबांनी ठेवला आणि आज त्यांच्या आश्रमात सर्व जातिधर्माचे लोक आहेत केवळ कुष्ट रोग्यांसाठीच नाही तर मूकबधिर व् अंधांसाठी एक शाळा त्यानी उभारली आहे.
कुष्ट रोग्यांसाठी उपचार प्रशिक्षण व पुनर्वसन या करीता त्यांनी रुग्णालयाची व् अन्य प्रशिक्षण केंद्रांची निर्मिति केलि आहे तरुणांसाठी महाविद्यालयाची स्थापना प्रौढ़ व् अपंगांसाठी हातमाग सुतारकाम असे व्यावसायिक प्रशिक्षण बाबांनी त्याना देऊन आर्थिक स्वावलम्बनचा मार्ग दाखवला आहे घनदाट जंगल , दळणवळण , संपर्काची साधने नाहीत प्रचंड पाऊस पावसात मार्ग अडवून टाकणाऱ्या नद्या नाले ,जंगली स्वापदांचा सुळसुळाट अन्न वस्र निवार्याची कमतरता कहीवेळा शासनाचा असहकार असताना त्यात आदिवसींचे अशिक्षितपणा ,अंधश्रद्धा अशी बिकट अवस्था असताना देखील प्रचंड जिद्दीने बाबांनी आपली कामे पूर्णत्वास नेली आहेत .
पण ते म्हणतात ना…
''जोची आवडे सर्वांना, तोचि आवडे देवाला ''
या प्रमाणे नवसंजीवनी देणारे बाबा फेब्रुवारी २००८ मध्ये अनंतात विलीन झाले. अशा या बाबांना त्रिवार मानाचा मुजरा …!
It's very nice babana manacha mujara
ReplyDeleteसादर नमन्
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteबाबा आमटे यांना मानाचा मुजरा
ReplyDeleteBaba aamte yana manacha mujra
Deletenice
ReplyDeleteAaaaaah waaaah mast awesome really howhmuch baba amte for india salute for such persons
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteKhup chan
ReplyDeleteबाबा आमटे was a Grate man
ReplyDelete