Friday, 20 March 2015

न्या.महादेव गोविंद रानडे


धर्मसुधारणा , समाजसुधारणा , सनदशीर राजकारण ,भारतीय अर्थकारण व सांस्कृतिक विकास या सर्वच क्षेत्रात संस्थाची स्थापना करून व त्या माध्यमातून पायाभूत कार्य करणारे थोर विचारवंत म्हणजेच न्यायमूर्ति महादेव गोविंद रानडे .
Image result for mahadev govind ranade
न्यायमूर्ति रानडेचा यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाड गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापुरात तर पुढील शिक्षण मुंबई येथे झाले. इतिहास विषय घेऊन एम.ए. पूर्ण केले. १८६६ मध्ये कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाले. मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो म्हणुन त्यांची नियुक्ती झाली.

प्रार्थना समाज, सार्वजनिक सभा, भारतीय सामाजिक परिषद इत्यादी विविध संस्था स्थापन करण्यात व त्यांचा विस्तार करण्यात त्यांचा प्रमुख सहभाग होता. अशा पद्धतीने त्यांनी भारतात संस्थात्मक जीवनाचा पाया घातला. असे त्यांच्याबद्दल गौरवाने म्हटले जाते. रानडे यांनी स्वातंत्र्यासाठी व सामाजिक सुधारणासाठी कायम घटनात्मक व सनदशीर मार्ग अवलंबिला होता स्वतंत्र्यपूर्व काळात रानडे मावळ प्रवाहाचे नेते होते त्यांनी भारतीय राजकारणात अर्थशात्रीय विचार आणला. स्वदेशीच्या संकल्पनेला त्यांनी व्यवहारिक रूप दिले.दि. ३१मार्च १८७६ रोजी न्या. रानडे यांनी डॉ. आत्माराम पांडुरंग , डॉ. रा. गो. भंडारकर ,वामन आबाजी मोड़क इत्यादी मंडळींनी पुढाकार घेऊन मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना झाली.

सामाजिक प्रश्नांचे महत्त्व लक्षात घेऊन समाजसुधारनेसाठी पुढाकार घेतला आहे. जाती प्रथेचे उच्चाटन अन्तरजातीय विवाहास परवानगी विवाहाच्या वयोमर्यादेत वाढ बहुपत्नीत्वाच्या प्रथेस आळा ,विधवा पुनर्विवाह स्त्री शिक्षण तथाकथित जातीबहिष्कृत लोकांच्या स्थितीत सुधारना हिंदू मुसलमानांच्या धार्मिक मतभेदांचे निराकरण हे त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या मागण्या होत्या. भारताच्या स्वतंत्र्यात मध्यवर्ती भूमिका बजावणाऱ्या 'राष्ट्रीय कॉंग्रेस 'या संघटनेच्या स्थापनेतही {१८८५ }न्यायमूर्ती रानडे यांचा महत्वाचा सहभाग होता न्या. रानडे हे उत्तम संशोधक व विश्लेषक होते हे त्यांच्या '' THE RISE OF MARATHA '' {मराठी सत्तेचा उदय }या ग्रंथावरुन दिसुन येते.

त्यांचे भारतीय अर्थशात्र्यातील योगदान मवाल व सनदशीर राजकारणातील मुलभुत कार्य या गोष्टी भारताच्या व महाराष्ट्राच्या जड़न घडणीत महत्वाच्या ठरतात. न्यायमूर्ती रानडे -नामदार गोखले -महात्मा गांधी या गुरु शिष्य परंपरेने सामाजिक व राजकीय क्षेत्रात केलेले महान कार्य संपूर्ण भारत जानतोच आहे. अशा या जनतेच्या न्यायमुर्तीला मुजरा ...!

No comments:

Post a Comment