बहुजन समाजाला शिक्षणरूपी अमृत मिळावे यासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून ज्ञानाची गंगा बहुजन समाजापर्यत पोहचवणारे समाजसुधारक म्हणजेच भाऊराव पाटील.यांचा जन्म कोल्हापूर
जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला.त्यांच मुळ गाव म्हणजे सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रूक होय. लहाणपणा पासुनच भाऊराव बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा या गावी झाले. पुढील शिक्षणासाठी ते कोल्हापूरच्या राजाराम हायस्कुलमध्ये दाखल झाले यावेळी त्यांची राहण्याची व्यवस्था जैन बोर्डिगमध्ये करण्यात आली. याच कालखंडात त्यांच्यावर राजर्षी शाहु महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला पुढे त्यांनी भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब भेडेकर आदी मंडळी बरोबर दुधगावात दुधगाव शिक्षण मंडळ स्थापन केले. याच संस्थे मार्फत सर्व जाती धर्माच्या मूलांसाठी एक वसतिगृह त्यांनी सूरू केले. आणि खर्या अर्थाने रयत शिक्षण संस्थेचे बीज तेथेच रोवले गेले. आणि नंतर ४ आक्टोबर १९१९ रोजी कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्हातील काले या गावी केली. पुढे या संस्थेचे मुख्यालय सातारा येथे नेण्यात आले.
त्यांच्या संस्थेची काही उद्दिष्टे होती. की मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे ती वाढवणे मागासलेल्या वर्गातील गरिब मूलांना मोफत शिक्षण देणे निरनिराळ्या जातीधर्मातील विद्यार्थामध्ये प्रेमभाव निर्माण करणे अयोग्य रूढींना फाटा देवून खर्या विकासाचे वळण लावणे. संघशक्तीचे महत्व जरूर तर कृतीने पटवून देणे सर्व मूले काटकसरी, स्वावलंबी शिलवान व उत्साही बनविण्याचा प्रयत्न करणे बहूजन समाजाच्या शिक्षण प्रसारणासाठी जरूर पडेल तेव्हा संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे.
हीच उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भाऊराव पाटलांनी आयुष्यभर अमाप कष्ट केले.त्यांच समाजात ज्ञानगंगा पोहचविण्याचे कार्य चालू असताना १९५९ साली पुणे विद्यापिठाकडून 'डी.लिट ' पदवी बहाल करण्यात आली. भारत सरकारनेही पद्मभूषण देवून त्यांचा गौरव केला शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यत पोहचविणार्या आधूनिक भगीरथाची प्राण ज्योत ९ मे १९५९ रोजी मालवली पण त्यांनी केलेलं कर्तृत्व आजही समाजात दिसत आहेत.अशा या कर्मवीराला मानाचा मुजरा....!
No comments:
Post a Comment