Thursday, 26 March 2015

राजर्षी शाहु महाराज




बहुजनांचे कैवारी , आदर्श शासनकर्ते व गोरगरिबांच्या सर्वांगीण विकासासाठी बहुजनांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण करणारे एक निष्ठावंत समाजसेवक म्हणजेच राजर्षी शाहु महाराज. 
Image result for rajarshi shahu maharaj
राजर्षी शाहु महाराजांनी समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला होता. तसेच त्यांनी कोल्हापूरमध्ये मराठा , लिंगायत , पांचाल , जैन , मुसलमान , शिंपी , वैश्य , ढोर , नाभिक अशा अनेक जातींच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरु केली. अश्यपृश्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी ' मिस क्लार्क बोर्डिंग ' हे वसतिगृह उभारले तसेच त्यांनी बहुजन समाजातील गरजु व होतकरु विद्यार्थ्यांना शिष्यवृत्या देवून त्यांना शिक्षण घेण्यास महाराजांनी प्रोत्सहान दिले त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. 

राजर्षी शाहु महाराजांनी सवर्ण व अश्यपृशांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची द्रुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली गावाच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणाऱ्या पाटिल शाळा ,प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या तंत्रे व कैशल्ये शिकवणाऱ्या शाळा ,बहुजन विद्यार्थ्यांसाठी वैदिक पाठशाला , संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबविले सर्वांना समान वागणूक दिली. ''दलितांच्या सेवेसाठी मला छत्रपतीचे सिंहासन सोडावे लागले तरी चालेल , मला त्याची पर्वा नाही ''अशी घोषणा त्यांनी केली होती जातिभेदला महाराजांचा तीव्र विरोध होता. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहस मान्यता देणारा कायदा कार्यन्वित केला। त्यांनी बहुजन समाजाची पिळवणूक करणारी कुलकर्णी वतने रद्द केली तसेच महार कुटुंबांना गुलाम करणारी महार वतने रद्द केली.

१९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा केला विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता दिली त्यांनी कायदा करून देवदासी प्रथा बंद केली बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवुन देण्यासाठी त्यांनी १९१६ मध्ये निपाणी येथे ' डेक्कन रयत असोसियशन ' या संस्थेची स्थापना केली तसेच त्यांनी 'शाहु छत्रपती स्पिनिंग अण्ड विव्हिंग मिल 'ची स्थापना शाहूपुरी व्यापरपेठीची स्थापना गुळाच्या बजारपेठेची स्थापना ,शेतकऱ्यांसाठी सहकारी संस्थेची स्थापना ,राधानगरी धरणाची उभारणी केली. शेती , उद्योग व सहकार क्षेत्रात राजर्षीनी नवनवे प्रयोेग केले तसेच युवकांमध्ये व्यायमाची आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांनी आखाडे , तालमी यांना आर्थसहाय्य केले. तसेच कुस्तीला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली म्हणून कोल्हापुरला 'मल्ल विद्येची पंढरी ' म्हटले जाते. ते यामुळेच शाहू महाराजांच्या या सर्वव्यापक कार्यामुळेच कुर्मी क्षत्रिय समाजाने त्यांना राजर्षी ही पदवी बहाल केली अशा या समाजसुधारकाचा अंत ६ मे १९२२ रोजी मुंबई येथे झाला. अशा समाजसुधारकाला व त्याच्या कार्याला मानाचा मुजरा ...!

No comments:

Post a Comment