१९ व्या शतकाचा शेवटचा कालखंड धर्मसुधारणा ,सामाजिक परिवर्तनाचा काळ म्हणून ओळखला .जातो या काळात वेगाने सामाजिक बदलांची प्रक्रिया घडत होती. या चळवळीचे नेतृत्व सखोलचिंतन करणाऱ्या
समाजहित जपणाऱ्या व धडक कृतीशील असणाऱ्या महात्मा फुले यांच्याकडे होते.महात्मा फुले यांचा जन्म १८२७ साली झाला. त्यावेळी संपूर्ण भारतात बहुजन समाज अंधकारात चाचपडत होत. अद्न्यान, अंधश्रद्धा व अस्पृश्यता यांचे भयंकर चटके सोसत होत.
स्त्री व त्याकालातील अस्पृश्य समाज हे या समाजव्यवस्थेतील सर्वाधिक उपेक्षित घटक होते. त्या काळात स्त्रिया ह्या शिक्षित नसल्याने स्वतःचे अस्तित्व गमावून बसल्या होत्या. या परिस्थितीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी शिक्षणाची अवस्था होती. त्यांना बाहेर काढण्यासाठी शिक्षणाची अवस्था होती. मुळात समाज उद्धारासाठी शिक्षण हेच प्रमुख शस्त्र होते. हे जोतिरावांनी ओळखले. एक स्री सुशिक्षित तर पुढील पिढ्या सुशिक्षित हे समीकरण त्यांनी जाणले आणि पवित्र कार्याची सुरुवात आपल्या पत्नीला शिक्षण देवून त्यांनी केली.
१८४८ साली देशातील पहिली मुलींची शाळा लोकांच्या विरोधला तोड़ देत सुरु केल्या स्त्रियांना सबल बनविण्यासाठी व् स्त्रियांच्या उद्धारासाठी त्यानी बालविवाह, कुमारी विवाह,विधवांचे केशवपन या अनिष्ट परंपरांच्या विरोधात जावून त्यांनी १८६४ साली पहिला विधवा पुनर्विवाह घडवुन आणला ही एक क्रांतिकारी घटनाच होती स्त्री उधाराबरोबरच अश्यपृशांचा उद्धार ते करत होते।त्या वेळचा अश्पृश्य समाज हा राजकीय,सामाजिक,शैक्षणिक व आर्थिक हक्कापासून वंचित होता त्यांना समाजाच्या मुळ प्रवाहत आणण्यासाठी त्यांच्या प्राथमिक मानवी हकांच्या प्राप्तीसाठी ते अनिष्ट रूढि परंपरांच्या विरोधात जावून क्रांतिकारी बदल करत गेले. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून ईश्वर एक आहे व तो निर्गुण-निराकार आहे ईश्वराच्या भक्तीसाठी कोणालाही त्याच्या मध्यथाची गरज नाही धार्मिक कर्मकांडावर विश्वास ठेवू नका हे विचार त्यांनी बहुजनांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला .
भारत हा कृषिप्रधान देश आहे तरीही येथील शेतकरी गरीब ,कर्जबाजारी व मागसलेला आहे यामुळेच या समस्या लक्षात घेऊन शेतकर्यांची बाजु मांडण्यास आणि संघटन करण्यास सुरुवात केली. शेतकरी व शेतमजूर यांच्या हलखीच्या परिस्थितीचे वर्णन त्यांनी ' शेतकर्यांचा आसुड ' या ग्रंथात केले आहे. महात्मा फुले त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा ,सार्वजानिक सत्यधर्म { ग्रंथ }या लेखन बरोबरच अखंड काव्याची रचनाही केली.
भारत हा कृषिप्रधान देश आहे तरीही येथील शेतकरी गरीब ,कर्जबाजारी व मागसलेला आहे यामुळेच या समस्या लक्षात घेऊन शेतकर्यांची बाजु मांडण्यास आणि संघटन करण्यास सुरुवात केली. शेतकरी व शेतमजूर यांच्या हलखीच्या परिस्थितीचे वर्णन त्यांनी ' शेतकर्यांचा आसुड ' या ग्रंथात केले आहे. महात्मा फुले त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा ,सार्वजानिक सत्यधर्म { ग्रंथ }या लेखन बरोबरच अखंड काव्याची रचनाही केली.
विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्तविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका विद्येने केले।
No comments:
Post a Comment