Thursday, 26 March 2015

सावित्रीबाई फुले



भारतातील स्त्री शिक्षणाची गंगोत्री आणि महात्मा फुले यांना ' सत्यशोधक ' मार्गात तेवढीच तोलमोलाची साथ देणाऱ्या क्रांतिज्योति म्हणजेच सावित्रीबाई फुले.
काटेरी अंथुरनावर जन्माला येऊन ज्यांना त्या अंथुरनाची सवय होते ते सामान्य म्हणून जगतात पण काट्यांची ज्यांना जाणीव होते आणि हक्काच सुख मिळविण्यासाठी ज्यांच्यात हिंमत असते ते असामान्य होतात भारत नावाच्या पुरुषप्रधान अडथळ्यातून वाट काढत प्रत्येक स्रीच्या जीवनाला शिक्षणाच्या अमृताचा आनंद देणाऱ्या सावित्रीबाई फुले या अशाच शिक्षण गंगोत्री आहे सातारा जिल्ह्यातील नायगांव हे त्यांच जन्मगाव जन्मवेळी इंग्रजसत्ता प्रथापित होउ लागली होती त्यामुळे वातावरण दबलेलं ,लाचारिच परतंत्र्याच होत पण तरीही बहुतांश समाजाला इंग्रजांची सवय झालेली होती देव धर्माच्या नावाखाली वर्चस्व गजविण्यासाठी तत्कालीन सवर्ण इतर जातीचा छल करात होते हिंदू समाजात या काळात स्री म्हणजे निव्वळ उपभोग्य वास्तु होती तिला शिक्षणाचा अधिकार नव्हता एवढेच नाही तर तिला ' नाही ' म्हणण्याचा अधिकार नव्हता पुरुषांनी घालून दिलेल्या चौकटीमध्ये आयुष्यभर यंत्रप्रमाणे धावत रहायचे आणि झिजत जायचे एवढेच तिच्या आयुष्यात उद्दिष्ट होते.
या सर्व चलिरीतींना बाजूला सारुन दिनांक १ जानेवारी १८४८ साली भिड़े वाड्यात त्यांनी मुलींची शाळा काढली ही अखंड हिन्दुस्तांतली स्वदेशी व्यक्तिने काढलेली पहिलीच मुलींची शाळा होती. सुरुवातीला शाळेत सहा मूली होत्या पण १८४८ साला पर्यँत ही संख्या ४५ वर जाऊन पोहचली या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी लोकांनी धर्म बुडाला … तर देश बुड़ेल अशा मारक शब्दात विरोध केला.
अंगावर शेण फेकले तर काही उन्मत्तान्नी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली अशी अनेक संकटे पार करत हा शिक्षण प्रसाराचा प्रवास चालूच राहिला घर सोडाव लागल अनेक आघात झाले पण सावित्रीबाई डगमगल्या नाहीत आपल्या विचारांचा प्रसार त्यानी आपल्या साहित्याचा माध्यमांतून केला' काव्यफुले' व 'बावनकुशी ' सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रह त्यांनी लिहले.

भारतीय स्त्रिला तिच्या आस्तिवाची सामर्थ्याची जाणीव देण्याचा धगधगत्या चितेवर स्त्रीचा देह जाळून टाकणाऱ्या समाजाला मानवतेचा मंत्र सांगणाऱ्या अक्षराच्या साथीने स्वतंत्र्याच्या सूर्याला माथ्यावर कोरण्याचा महात्मा जोतिरवासारख्या महान सुधारकाचा आधार होणाऱ्या या माउलीस प्लेगरोग्यांची सेवा करताना स्वःच्या आयुष्याची फिकिर नव्हती इतरांच्या जीवन ज्योतीना हातचा आडोसा धरताना सवित्रीबाईच्या स्वतःच्या हातांना लागलेली धग त्यांना जानविली नाही सवित्रीबाईना प्लेग झाला असामान्य जीवन जगणारी ही शिक्षणाची गंगोत्री अखेर समान्यांच्या प्रवाहत त्यांच्यासारखीच होऊन त्यांच्या साठीच विलीन झाली अशा या शिक्षण गंगोत्रीच्या सवित्रीला मानाचा मुजरा...!